Home ठळक बातम्या एकनाथ शिंदे समर्थकांचे डोंबिवलीत शक्तीप्रदर्शन ; संजय राऊत यांचा पुतळा जाळत जोरदार...

एकनाथ शिंदे समर्थकांचे डोंबिवलीत शक्तीप्रदर्शन ; संजय राऊत यांचा पुतळा जाळत जोरदार घोषणबाजी

 

डोंबिवली दि.२७ जून :
राज्यामध्ये सध्या सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे समर्थकांनी आज डोंबिवलीत शक्तीप्रदर्शन केलेले पाहायला मिळाले. तसेच यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा पुतळा जाळण्यासह त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या बंडाच्या पावित्र्यामूळे राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील एकनाथ शिंदे समर्थकांनी आज घारडा सर्कल येथे एकत्र येत एकनाथ शिंदे यांना आपला भक्कम पाठिंबा दर्शवला. ‘एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ देण्यात आल्या.

तर एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांवर विखारी टिका करणाऱ्या शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याविरोधातील रोषही यावेळी शिंदे समर्थकांनी व्यक्त केला. संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केल्याचे पाहायला मिळाले.

त्याचसोबत संजय राऊत यांनी यापुढे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द काढल्यास सहन करणार करणार नसल्याचा इशाराही यावेळी एकनाथ शिंदे समर्थकांनी यावेळी दिला. तर एकनाथ शिंदे आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आम्ही पूर्ण ताकदीने उभे असल्याचेही या समर्थकांनी अधोरेखित केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा