लसींचा साठा उपलब्ध नसल्याने फक्त 2 केंद्रांवर होणार लसीकरण
कल्याण-डोंबिवली दि.14 मे :
उद्या 15 मे रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये कोवॅक्सिन लसीचा 2 रा डोस दिला जाणार असून फक्त दोनच केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून लस संपेपर्यंत ऑफलाईन (टोकन घेऊन नंबर लावणे) पध्दतीने हे लसीकरण केले जाणार आहे.
45 वर्षांवरील नागरिक आणि हेल्थ केअर वर्कर्स, फ्रन्टलाइन वर्कर्सचेच लसीकरण होणार असून *कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे शाळा आणि डोंबिवलीतील वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल या 2 च लसीकरण केंद्रांवर ही लस दिली जाणार आहे.*
तर कोविशील्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने त्याचे उद्या लसीकरण होणार नाही. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविशील्ड लसीचा 2 रा डोस घेण्याचा कालावधी 12 ते 16 आठवडे करण्यात आला आहे. परिणामी 1 ला डोस घेऊन 84 दिवस झाल्यानंतरच 2 रा डोस मिळेल अशी माहितीही केडीएमसीने दिली आहे.
*#LNN*
*#LocalNewsNetwork*