Home कोरोना कल्याणातील धक्कादायक प्रकार : वापरलेले पीपीई किट, मास्क, इंजेक्शन आढळले कचराकुंडीत

कल्याणातील धक्कादायक प्रकार : वापरलेले पीपीई किट, मास्क, इंजेक्शन आढळले कचराकुंडीत

कल्याण दि.13 एप्रिल :
एकीकडे कल्याण पश्चिमेला रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली असतानाच स्टेशन रोडवर असणाऱ्या कचराकुंडीत वापरलेले पीपीई किट, मास्क, इंजेक्शन आणि हँडग्लोव्हज आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी कचरा वेचण्यासाठी आलेल्या व्यक्तीला या सर्व गोष्टी कचऱ्यात टाकलेल्या आढळून आल्या. मात्र हा घाणेरडा प्रकार कोणी केला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाहीये. (Shocking incident in kalyan: Used PPE kits, masks, injections found in the trash)
कल्याण पश्चिमेच्या स्टेशन रोडवर सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या समोर रस्त्यावर कचरा टाकला जातो. त्यामध्ये कचरा वेचण्यासाठी आलेल्या व्यक्तीला याठिकाणी वापरलेले हँडग्लोव्हज, मास्क, पीपीई किट इंजेक्शन आदी वस्तू आढळून आल्या. तसेच त्यात एका डेंटिस्टने लिहिलेला औषधांचा कागदही सापडला आहे. मात्र हा घाणेरडा प्रकार नेमका कोणी केलाय याची अद्याप ठोस माहिती मिळू शकली नाही. आधीच कल्याण पश्चिमेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून अशा प्रकारामूळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेला देखील माहिती देण्यात आली असून ते संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा