Home Uncategorised निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि केडीएमसी आयोजित ‘रक्तदान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि केडीएमसी आयोजित ‘रक्तदान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

50 हून अधिक रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कल्याण- डोंबिवली दि.11 एप्रिल :
सध्या कोवीडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असून ‘थॅलिसीमियाग्रस्त’ मुलांच्या रक्ताचीही तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध सामाजिक संस्था, महापालिका कर्मचारी, पत्रकार आणि अनेक जागरूक नागरिकांनी यात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले.

कोवीडच्या दुसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने ‘रक्तदाना’साठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाची दखल घेत कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिसीट असोसिएशन (रजि.) आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. थॅलेसेमियाग्रस्त मुलांना रक्तपुरवठा करणाऱ्या ठाण्यातील रोटरी क्लबच्या ब्लडबँकेकडे हे रक्त जमा करण्यात आले.

 

कोवीडच्या सर्व नियम काटेकोरपणे पालन करत 55 हून अधिक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये कल्याणातील वॉर सामाजिक संस्था, महापालिका सुरक्षा रक्षक, पत्रकार आणि विविध जागरूक नागरिकांचा मोठा सहभाग होता. कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांनी आणि केडीएमसीच्या सुरक्षारक्षकांनी रक्तदान करुन या शिबिराला सुरुवात केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिका सचिव संजय जाधव, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आदींचे या सामाजिक उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा