Home कोरोना कल्याण डोंबिवलीत पुढील 15 दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा – केडीएमसी आयुक्तांचे...

कल्याण डोंबिवलीत पुढील 15 दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा – केडीएमसी आयुक्तांचे पोलिसांना निर्देश

 

कल्याण-डोंबिवली दि.15 मे :
कल्याण डोंबिवलीमध्ये स्थिरावलेली कोवीड रुग्णसंख्या आणि नियंत्रणात आलेली कोवीड परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जाऊ नये यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये उद्यापासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. उद्या रविवार 16 मे पासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असून नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत आज सकाळी ऑनलाईन झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. (strict-implementation-of-lockdown-in-kdmc-area-for-next-15-days-kdmc-commissioner-instructs-police)

कल्याण आणि डोंबिवलीत सध्या कोवीड रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्वत्र शिथीलता दिसून येत आहे. गेल्या महिन्यापेक्षा सध्या परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली असली तरी अद्यापही कोवीडचा धोका संपूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे उद्यापासून 15 दिवस सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. 11 एप्रिलला रुग्णसंख्या 2 हजार 400 पर्यंत पोहोचली होती. सध्या ती 500 पर्यंत खाली आली असली तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढली तर परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे येत्या 15 दिवसात रुग्णसंख्या कमी करण्याच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीत सर्वत्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

केडीएमसी आयुक्तांनी दिले हे निर्देश…

 • विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची होणार अँटीजन टेस्ट…
 • पोलिसांनी नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित करावी
 • विनाकारण गर्दी करणाऱ्या आणि फिरणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी.
 • पहिल्या लॉकडाऊनसारखेच आताही काम करावे.
 • कल्याणमध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन, तहसील कार्यालयाजवळ या ठिकाणी आणि डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अँन्टीजन टेस्ट करावी.
 • सकाळी 11नंतर प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करण्यासह जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी,
 • वाईन्सच्या दुकानात आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी दिसून येत असल्याच्या तक्रारी असून त्या दुकानांची पाहणी करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे.
 • सर्व विभागीय उपायुक्तांनी आपापल्या एरीयात दिवसातून किमान 2 ते 3 वेळा पाहणी करावी,
 • अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास ड्रोनचा वापर करावा,
 • लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केटमधील गर्दी कमी करण्याचे पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी नियोजन करावे,
 • लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून आल्यास मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत विचार करावा,
 • रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात. आणि गर्दी दिसली तर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करावी
 • सकाळी 11 नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसल्यास कठोर कारवाई करावी,

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा