Home ठळक बातम्या बाराव्या मजल्यावरील सज्जावर बसलेल्या युवकाची केडीएमसी अग्निशमन दलाकडून सुटका

बाराव्या मजल्यावरील सज्जावर बसलेल्या युवकाची केडीएमसी अग्निशमन दलाकडून सुटका

कल्याण शीळ मार्गावरील लोढा कॉम्प्लेक्स परिसरातील प्रकार

डोंबिवली दि. २ डिसेंबर :
बारा मजली इमारतीच्या गच्चीवर असलेल्या सज्जावर जाऊन बसलेल्या एका युवकाची केडीएमसी अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली आहे. कल्याण शीळ मार्गावरील लोढा कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

लोढा परिसरात असणाऱ्या एका बारा मजली इमारतीच्या गच्चीवरील सज्जावर एक युवक बसला असल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाच्या लोढा येथील कार्यालयाला प्राप्त झाली. आणि इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित या इमारतीच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचत त्यांनी घटनेचे गांभिर्य ओळखले आणि आपल्यातील काही जवानांना हा युवक बसलेल्या १२ व्या मजल्यावरील सज्जाच्या खाली जीव रक्षक जाळी घेऊन उभे केले.

तर अग्निशमन केंद्र अधिकारी सुधीर दुशिंग, सुरेश गायकर, विकास चव्हाण यांनी इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली. इमारतीच्या गच्चीवर पोहोचताच या युवकाच्या लक्षात न येता अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या युवकाच्या अंगावर नकळतपणे एक दोरी टाकून पकडले आणि त्याद्वारे त्याला वर गच्चीवर खेचून आणल्याची माहिती केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनामुळे या युवकाचा जीव वाचू शकला. कौटुंबिक तणाव आणि चिंतेतून या युवकाने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती असल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तर या युवकाचा जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दल जवानांचे कौतुक केले जात आहे.

युवकाचा जीव वाचवणारे केडीएमसी अग्निशमन दल जवान

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा