Home कोरोना बोंबला ; कल्याण डोंबिवलीत उद्या केवळ 2 ठिकाणीच लसीकरण होणार

बोंबला ; कल्याण डोंबिवलीत उद्या केवळ 2 ठिकाणीच लसीकरण होणार

शासनाकडून लसच उपलब्ध झाली नाही

कल्याण – डोंबिवली दि. 22 जून :
शासनाकडून लस उपलब्ध न झाल्यामुळे उद्या बुधवार 23 जून रोजी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात केवळ 2 ठिकाणी लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी 18 वर्षे आणि त्यावरील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

उद्या 23 जून रोजी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह या 2 लसीकरण केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार आहे. याठिकाणी 18 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांसाठी 50 टक्के ऑनलाईन स्लॉट बुक करून आणि 50 टक्के ऑफलाइन पध्दतीने हे लसीकरण होणार आहे.
ऑनलाइन बुकिंगसाठी आज रात्री 10 वाजता स्लॉट खुले होणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा