Home ठळक बातम्या कल्याणात डम्पिंगला पुन्हा आग लागल्याची घटना

कल्याणात डम्पिंगला पुन्हा आग लागल्याची घटना

कल्याण दि.30 मे :
काही दिवसांपूर्वीच कचरा टाकणे बंद झालेल्या कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला काल रात्री पुन्हा आग लागल्याची घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप तरी समोर आलेले नाही.
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीची माहिती मिळाल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. (Incident of re-fire at dumping ground in Kalyan)

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे काही दिवसांपूर्वीच हे डम्पिंग ग्राऊंड कचरा टाकण्यासाठी बंद करण्यात आले आहे. अनेक तांत्रिक अडचणी आणि विविध छुप्या विरोधांवर मात करत महापालिका प्रशासनाने डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचे काम करून दाखवले आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राऊंड कधीच बंद होऊ नये असे वाटणाऱ्या आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या काही झारीतील शुक्राचार्यांची पोटदुखी वाढली आहे. आणि कदाचित त्यातून डम्पिंगला आग लागण्याचा प्रकार घडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा