Home कोरोना कल्याण डोंबिवलीत महापालिकेतर्फे उद्या (3 जुलै) 5 ठिकाणी कोवीड लसीकरण

कल्याण डोंबिवलीत महापालिकेतर्फे उद्या (3 जुलै) 5 ठिकाणी कोवीड लसीकरण

 

कल्याण – डोंबिवली दि. 2 जुलै :
कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे उद्या 18 वर्षांवरील नागरिकांचे कल्याण डोंबिवलीमध्ये 5 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जाणार आहे. कल्याणात आचार्य अत्रे रंग मंदिर, आर्ट गॅलरी- लालचौकी, प्रबोधनकार ठाकरे शाळा येथे तर डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिर आणि वै. सावळाराम म्हात्रे महाराज क्रिडा संकुल या 5 ठिकाणी हे लसीकरण केले जाणार आहे.

त्यापैकी डोंबिवलीच्या वै. सावळाराम म्हात्रे महाराज क्रिडा संकुल, लालचौकी आर्ट गॅलरी आणि कल्याण पूर्वेतील प्रबोधनकार ठाकरे या 3 केंद्रांवर कोविशील्ड लसीचा केवळ 2 रा डोस देण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे लसीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित 2 ठिकाणी कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.

त्याचबरोबर परदेशी जाणा-या नागरिकांसाठी‍ आर्ट गॅलरी, लालचौकी येथे 2रा डोस दिला (पहिला डोस घेतल्यानंतर  28 दिवस झालेल्या व्यक्तींना) जाणार आहे. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर लस दिली जाणार असून आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती लसीकरण केद्रांवर जमा केल्या जाणार असल्याचेही केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

या लसीकरणासाठी आज रात्री 10.00 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा