Home राजकीय घडामोडी वाद मिटवण्याऐवजी मनसे आमदारांनी चुकीच्या लोकांची बाजू घेतली – शिवसेनेचे ज्येष्ठ माजी...

वाद मिटवण्याऐवजी मनसे आमदारांनी चुकीच्या लोकांची बाजू घेतली – शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे

 

डोंबिवली दि.10 फेब्रुवारी :
मोरोशी गावात घडलेल्या घटनेप्रकरणी आपल्यावर झालेले सर्व आरोप चुकीचे असून याप्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांनी हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजे होते. मात्र तसे न करता त्यांनी चुकीच्या लोकांची बाजू घेत हे प्रकरण लावून धरले अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिली.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील दहिसर, दहिसर मोरी आणि मोकाशी पाडा गावात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात आपली बाजू मांडण्यासाठी रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर ही टिका केली. तसेच आजी माजी आमदारांच्या दबावामूळे आपल्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दहिसर मोरी, दहिसर आणि मोकाशी पाडा या तीन गावांना शासनाची 284 एकर जमीन मिळाली असून या जमिनीची एकत्रित विक्री करून ग्रामस्थांना त्याचा मोबदला सम प्रमाणात वाटून घेण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. मात्र शासनाने ही जमीन देताना नेमलेल्या 11 पैकी 5 पंचाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 6 पंचांपैकी 3 पंच या जमीन विक्री व्यवहारासाठी आवश्यक बँकेचे खाते उघडण्यास तयार नसल्याचे सांगत या पंचांना समजावण्यासाठी आपण त्या गावात गेलो होतो अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी चर्चा करत असताना संबधित पंच एकनाथ मोकाशी आणि त्यांच्या भावामध्ये वाद झाला. मोकाशीना समजावण्याचा आपल्याबरोबरच त्यांचा भाऊ देखील प्रयत्न करत होता. त्यातून त्यांची आपापसात मारामारी झाली. या दरम्यान आपल्या सुरक्षारक्षकाच्या गाडीवर दगडफेक झाल्याने काच फुटल्याने आपल्या अंगरक्षकानी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याचे म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर आपल्यावर हत्यारे काढल्याचा करण्यात आलेला आरोपही चुकीचा असून आपण तशी कोणतीही कृती केली नसल्याचे ते म्हणाले.

तसेच मोकाशी गावातील जवळपास 550 कुटुंबाचा हा प्रश्न असल्याने स्थानिक आमदार म्हणून राजू पाटील यांनी याप्रश्नी सामंजस्याची भूमिका घेत तो सोडवणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ते करण्याऐवजी चुकीच्या व्यक्तींना पाठींबा दिल्याचेही रमेश म्हात्रे यांनी सांगितले. तर मनसे आमदारांनी केवळ टिका करण्यापेक्षा मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही रमेश म्हात्रे यांनी यावेळी दिला.

 

आपल्याला तिकडच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नाही – आमदार राजू पाटील

आमच्या लोकांवर अन्याय होत असेल, दबवाखाली पोलिस गुन्हा दाखल करीत नसतील तर आपण दबाव टाकला नाही नये तर मी आमदार कसला अस सवाल कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. तसेच आपण शंभर टक्के पीडित शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत. या जागेमध्ये कोणाचा काय फायदा आहे, हे मला माहिती नाही. आणि आपल्याला त्या जागेमध्ये स्वारस्यही नाही. केवळ शेतकरी कुटुंबीयांवर अन्याय झाल्याने आपण त्यांच्या मदतीला गेल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तसेच पिडीत शेतकरी कुटुंबाला आवश्यक ती कायदेशीर मदत लागल्यास ती करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा