Home ठळक बातम्या अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत कल्याणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

अंमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत कल्याणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

कल्याण युथ फोरम आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचा संयुक्त उपक्रम

कल्याण दि.३ ऑक्टोबर :
सध्याची युवा पिढी विविध प्रकारच्या अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा प्रकारच्या अंमली पदार्थांपासून त्यांना दूर ठेऊन निरोगी आयुष्याबाबत जनजागृती करण्यासाठी कल्याणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीला योग्य दिशा दाखवून चांगल्या मार्गावर नेण्यासाठी कार्यरत असणाऱ्या कल्याण युथ फोरम आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

कल्याण पश्चिमेच्या चिकण घर येथील टर्फ क्लबवर झालेल्या या स्पर्धेमध्ये कल्याण आणि आसपासच्या परिसरातील ३० च्या आसपास संघ सहभागी झाले होते. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक देशमुख, कल्याण युथ फोरमचे अध्यक्ष प्रा. रघुनाथ पाटील, सचिव सीए गणेश पाटील आदींच्या प्रमूख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

सध्याची युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यासह विविध व्यसनांच्या नादी लागून आपले आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचे आयुष्य पणाला लावताना दिसून येत आहे. अशा नकारात्मक गोष्टींपासून या तरुण पिढीला दूर ठेऊन राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने गेल्या २ वर्षांपासून कल्याण युथ फोरम ही संस्था कार्यरत आहे. तरुण पिढी हीच देशाचे भवितव्य असून आपले भवितव्य चांगले बनवायचे असल्यास ही युवा पिढी तितकीच चांगली आणि सक्षम असणे आवश्यक आहे. आणि नेमक्या याच उद्देशातून कल्याण युथ फोरम काम करत असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. रघुनाथ पाटील यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा