Home ठळक बातम्या ज्येष्ठ संगीतकार – गायक श्रीधर फडके यांच्या सांगितिक संध्येला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्येष्ठ संगीतकार – गायक श्रीधर फडके यांच्या सांगितिक संध्येला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.२५ एप्रिल :

हेमलकसा येथील पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडतर्फे आयोजित सांगितिक संध्येला कल्याणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांची ऋतू हिरवा ही सांगीतिक मैफल कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडली. या कार्यक्रमातून गोळा झालेला सुमारे दिड ते दोन लाख रुपयांचा निधी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला दिला जाणार आहे.

या सांगीतिक संध्येची सुरुवात जेष्ठ गायक श्रीधर फडके , क्लब प्रेसिडेंट रो. राजेश चासकर, प्रकल्प प्रमुख रो. अरविंद शिंदे , सेक्रेटरी रो. अभिलाषा पवार , ट्रेझरर रो. पल्लवी चौधरी आणि अक्षरमंच प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील सिनेमातील ” ने मजसी ने परत मातृभूमीला ” या गाण्याने श्रीधर फडके यांनी ऋतू हिरवा या सांगितिक मैफिलीला प्रारंभ झाला.
त्यानंतर त्या कोवळ्या फुलांचा , फिटे अंधाराचे जाळे, ओंकार स्वरुपा, जय शारदे वागिश्वरी, ऋतू हिरवा-ऋतू बरवा, मी राधिका मी प्रेमिका अशा एकाहून एक सुंदर रचना श्रीधर फडके यांच्यासह शिल्पा पुणतांबेकर, शेफाली साकुरीकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

तर गाणे सादर करण्यापूर्वी श्रीधर फडके आणि निवेदिका सुकन्या जोशी यांनी गाण्याची जन्मकथा आणि त्या गाण्याविषयक आठवणी सांगून सांगीतिक संध्येमध्ये आणखीनच रंग भरला. ज्याला तुषार आगरे (तबला) , व्यंकटेश कुलकर्णी (तालवाद्य), ओमकार गोखले (की बोर्ड), वरद कठापूरकर (बासरी) यांनी वादन तितकीच मोलाची साथ दिली.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी फर्स्ट लेडी गायत्री चासकर, सचिन पीतांबरे, प्रबोध तनखीवाले, अतुल धुमाळ, सचिन चौबे, डॉ. घोणे, शरद चासकर, एम. जे. मुशिर , बाळासाहेब एरंडे, संजय पैठणकर, सोमनाथ चौधरी , डॉ. स्मिता तानखीवाले, निशिगंधा वनसूत्रे, क्षमा कुलकर्णी, संगीता अ. शिंदे, पल्लवी पीतांबरे आदी रोटरी सदस्य तसेच रोट्रॅक्ट क्लबचे अभिजित बाऊसकर, ओंकार धुमाळ, सतीश गुप्ता, प्रणित कासरे, तेजस्विनी बाऊसकर, देव नागरवाला, आनंद काजरोले , सानिया पाटील, प्रणाली पाटील आदींनी विशेष सहकार्य केले.

या कार्यक्रमाला डीजीएनडी हर्ष मकोल, सीडीएमटी सदस्य ललित मानिक, प्रमोद मौलवी तसेच कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला कल्याणकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा