Home ठळक बातम्या येत्या मंगळवारी (12 मार्च 2024) कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद

येत्या मंगळवारी (12 मार्च 2024) कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा राहणार बंद

कल्याण डोंबिवली दि.8 मार्च :
येत्या मंगळवारी 12 मार्च २०२४ रोजी कल्याण डोंबिवली, टिटवाळ्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. टाटा पॉवरच्या कांबा सबस्टेशनमधील फिडरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातही विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांची दुरूस्तीच्या कामासाठी मंगळवारी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

या दोन्ही देखभाल दुरुस्ती कामांमुळे येत्या मंगळवारी 12 मार्च रोजी सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत असा 9 तास कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

ज्यामध्ये कल्याण पश्चिम, कल्याण पूर्वेसह कल्याण ग्रामीण विभागातील मांडा – टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमेच्या परिसरास होणार पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

त्यामूळे या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा