Home ठळक बातम्या Live Updates : कल्याणातील पूरजन्य परिस्थितीचे लाईव्ह अपडेट्स (22 जुलै 2021)

Live Updates : कल्याणातील पूरजन्य परिस्थितीचे लाईव्ह अपडेट्स (22 जुलै 2021)

दुपारी 12.20 मिनिटे : कल्याणच्या रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाउंड परिसर जलमय…व्हिडीओ -माहिती सौजन्य : अझर शेख, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

दुपारी 12 वाजता : कल्याणच्या वडवली गावातही शिरले पुराचे पाणी…फोटो – माहिती सौजन्य :- आदेश तरे, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 11.40 मिनिटे : कल्याणच्या शहाड परिसरात असणाऱ्या मार्बलच्या दुकानांना पुरजन्य परिस्थितीचा फटका…इथल्या दुकानांमध्ये 3 फुटांपर्यंत साचले पाणी…*फोटो – माहिती सौजन्य :- एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 11.20 मिनिटे : मांडा -टिटवाळा परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झाली पुरजन्य परिस्थिती…*फोटो – माहिती सौजन्य :-, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 11.वाजता : कल्याण – मुरबाड मार्गावर असणाऱ्या म्हारळ परिसरातही पुरजन्य परिस्थिती…रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचले पाणी… फोटो – माहिती सौजन्य :-  रोहीत तिवारी, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 10.40 वाजता : कल्याणच्या पौर्णिमा चौकातील ज्योती कॉम्प्लेक्स, भोईर बिल्डींग, नवतुलसी कॉम्प्लेक्स सोसायटीमध्येही शिरले पाणी… *फोटो-माहिती सौजन्य :- रोशन भोईर, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 10.30 वाजता : कल्याणच्या वाडेघर येथून दुर्गाडी पूलाकडे जाणाऱ्या मार्गावर पाणीच पाणी…दुर्गाडी चौकाकडे जाणारी एका बाजूची वाहतूक झाली बंद.. फोटो -माहिती सौजन्य :- संदीप गायकवाड, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 10.00 वाजता : पावसाचे पाणी साचल्यामुळे मोहने -शहाड मार्ग झाला बंद…फोटो – माहिती सौजन्य :- एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 9.40 मिनिटे: कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी – उल्हासनगर मार्ग झाला बंद…संपूर्ण रस्त्यावर वालधुनी नदीचे पाणी पसरल्यान वाहतूक करण्यात आली बंद…

सकाळी 9.20 मिनिटे : कल्याणच्या पौर्णिमा चौकातील ज्योती कॉम्प्लेक्स सोसायटीमध्येही शिरले पाणी…*फोटो-माहिती सौजन्य :- रोशन भोईर, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 9.10 मिनिटे : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमीजवळील रस्त्याला प्राप्त झाले नदीचे स्वरूप…त्यामुळे रस्ता झाला बंद….*व्हिडीओ – माहिती सौजन्य :- पवन यादव, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 9.00 वाजता : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्येही झालेय पाणीच पाणी..व्हिडीओ -माहिती सौजन्य : कमलाकर भडकवाड, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 8.37 : मुसळधार पावसामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने शहाड पुलावरून मुरबाडकडे जाणारी वाहतूक झाली ठप्प…

सकाळी 8.32 : मोहने पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे कल्याण ग्रामीण, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम तसेच कल्याण पश्चिम ब प्रभागाचा पाणीपुरवठा करण्यात आला बंद….पाणी ओसरल्यावर पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची केडीएमसीची माहिती…

सकाळी 7.48 : मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाणी गांधारी परिसरात असणाऱ्या शेतात तसेच सोसायटीच्या आवारापर्यंत पोहचले… फोटो माहिती सौजन्य :- गणेश गायखे, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 7.47 : मुसळधार पावसामुळे शहाड परिसरातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप…शहाड ब्रिज परिसरात रस्त्यावर साचले मोठ्या प्रमाणात पाणी…फोटो – माहिती सौजन्य : अक्षय एखंडे, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 7.42 : मुसळधार पावसामुळे कल्याण पश्चिमेतील घोलप नगर परिसरातील रस्ते झाले जलमय… फोटो -माहिती सौजन्य :- रोहीत पानसरे, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

सकाळी 7.40 : कल्याण पूर्वेच्या वालधुनी परिसरातील शिवाजी महाराज नगर आणि सातारकर चाळ परिसरात पाणी शिरण्यास सुरुवात… अचानक मध्यरात्री पावसाचे पाणी शिरल्याची स्थानिकांची माहिती… फोटो – माहिती सौजन्य :- निखिल टोकेकर, एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा