Home ठळक बातम्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कल्याणच्या नेत्रा फडकेने सुवर्ण पदक पटकावत रचला इतिहास

राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कल्याणच्या नेत्रा फडकेने सुवर्ण पदक पटकावत रचला इतिहास

कल्याण दि.३१ मे :
वर्ल्ड पॉवरलिफ्टींग इंडियातर्फे नॅशनल रॉ पॉवर लिफ्टींग स्पर्धा नुकतीच हावरा कलकत्ता येथे पार पडली. या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत कल्याणच्या नामांकित नमस्कार मंडळ संस्थेची खेळाडू नेत्रा प्रसाद फडकेने सबज्युनिअर 84 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून नविन इतिहास रचला. नेत्राने डेडलिफ्ट आणि स्कॉट या दोन्ही प्रकारात यशस्वी वजन उचलून राष्ट्रीय रेकॉर्ड करत सुवर्ण पदकाला गवसणी तर घातलीच पण त्याचबरोबर सब ज्युनिअर गटात बेस्ट लिफ्टर ऑफ इंडीयाची ट्रॉफिही पटकावली. (Netra Phadke of Kalyan made history by winning gold medal in National Powerlifting Competition)

नेत्राने पॉवरलिफ्टिंगमध्ये या अगोदरही अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या असून पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कल्याणचे नाव उज्वल करायचे स्वप्न नेत्रा पाहत आहे. नेत्राला या कामगिरीसाठी नमस्कार मंडळाचे प्रशिक्षक श्रीबास गोस्वामी आणि छत्रपती पुरस्कार विजेत्या पल्लवी गोस्वामी तसेच अशोक दिक्षित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

नेत्रासह तिच्या टिममधील नमस्कार मंडळाचे खेळाडू अथर्व दुर्गोळी, निनाद जाधव, ज्ञानेश्वर पथारकर, अजयकुमार निगम, यश खुटवाड, शुभम चौधरी, वैष्णवी पाटील , रेखा काकडे , अशोक दिक्षित आणि पल्लवी गोस्वामी यांनीही या स्पर्धेमध्ये विविध पदके मिळवली. तसेच वरद करमरकर या खेळाडूने सुवर्ण पदकासह पुरुष ज्युनिअर गटात बेस्ट लिफ्टर आँफ इंडियाचा किताब पटकवला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा