अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाचा निर्णय
कल्याण डोंबिवली दि.१९ जुलै :
कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे तसेच येत्या पुढील दोन ते तीन दिवसात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना उद्या 20 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.(A holiday has been announced for schools in KDMC area tomorrow on 20th July 2023)
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढत ही माहिती दिली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अतिवृष्टी होत असून पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव उद्या 20 जुलै 2023 रोजी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत च्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.