Home ठळक बातम्या पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना अटक करा; भाजप कल्याण पश्चिमतर्फे पोलिसांना...

पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंना अटक करा; भाजप कल्याण पश्चिमतर्फे पोलिसांना निवेदन

कल्याण दि.20 जानेवारी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी भाजप कल्याण पश्चिमच्या वतीने महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.

देशाच्या पंतप्रधानांना अशा पद्धतीने बोलणे ही काँग्रेसची संस्कृती आहे का? आता काँग्रेस पाकधार्जिनी भाषा बोलत आहे. ज्या नेत्याला मतपेटीतून हरवू शकत नाही, त्यांना मारण्यापर्यंत काँग्रेसची मजल जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच पंजाबला मोदीजींचा ताफा अडवला होता त्यावर काँग्रेसचे तिथले मुख्यमंत्री उत्तर देत नाहीत, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मारण्याची भाषा करतात हे योग्य नाही, काँग्रेस राजकीय पक्ष आहे की दहशतवादी अड्डे चालवणारी यंत्रणा? काँग्रेसने पाकधार्जिनी भाषा बोलू नये, नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.

यावेळी कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला आघाडी प्रदेश सचिव प्रिया शर्मा, महिला आघाडी मंडळ अध्यक्षा ज्योती भोईर, ॲड समृध्द ताडमारे, अमित धाक्रस, दिपक ब्रीद, स्वप्नील काटे, श्याम मिरकुटे, प्रताप टूमकर, अशोक मिरकुटे, नितिन सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मागील लेखलिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 505 रुग्ण तर 1 हजार 401 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा