Home ठळक बातम्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांना लवकरात लवकर अटक करा – बाळासाहेबांची शिवसेना...

राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांना लवकरात लवकर अटक करा – बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मागणी

 

कल्याण दि. २४ डिसेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलेच पडसाद उमटताना दिसत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण डोंबिवलीतील पदाधिकारी यावरून चांगलेच आक्रमक झाले असून परांजपे यांच्या अटकेची जोरदार मागणी केली आहे. कल्याणचे शहर प्रमूख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डी सी पी सचिन गुंजाळ यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी रवी पाटील यांनी डीसीपींकडे करण्यात आली.

यावेळी पक्षातर्फे आपल्या मागणीचे एक निवेदनही डी सी पी सचिन गुंजाळ यांना सादर करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर , सुनिल वायले , मोहन उगले, संजय पाटील, महिला पदाधिकारी छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा