गूडन्यूज: २७ गावांना मिळणार मुबलक पाणी – उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश

    खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश, उद्योगांना प्रक्रिया केलेले पाणी देण्याच्या हालचाली मुंबई दि. ३० सप्टेंबर :  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत २७ गावांना उच्च दाबाने आणि मुबलक पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. एमआयडीसीकडून शहराला १०५ दशलक्ष लीटर पाणी देणे अपेक्षितअसताना फक्त ६० दशलक्ष लीटर पाणी मिळत असल्याची बाब यावेळी उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.त्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कल्याण डोंबिवलीला ९० दशलक्ष लीटर पाणी देणारच असे स्पष्ट केले. यावेळी शहरातील इतर पाणी समस्यांवरही दिलासादायक निर्णय घेण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कायम सक्रीय असतात. त्यांच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा योजना मार्गी लागते आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून केल्या जात होत्या. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने केली जात होती. ९० दशलक्ष लीटर पाणी उच्च दाबाने देण्याचे आदेश... यासह शहरातील पाण्याच्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने आज (शुक्रवारी ) मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी शहरातील पाण्याच्या समस्या मांडल्या. कल्याण डोंबिवली पालिकेसाठी १०५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर आहे. मात्र अवघा ६० दशलक्ष लीटर पाणी प्रत्यक्षात मिळते. त्यामुळे किमान ९० दशलक्ष लीटर पाणी मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी तात्काळनिर्णय देतकिमान ९० दशलक्ष लीटर पाणी तेही उच्च दाबाने देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच एमआयडीसीकडून किती पाणी पुरवण्यात येते, त्याचा दाब किती असतो, याची माहिती मिळण्यासाठी येथे मीटर बसवण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले. अमृत योजनेत पाणी पुरवठा करण्यासाठी हेदुटने आणि कोळे येथे दोन नव्या जोडण्या देण्याची मागणी होती.त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निर्णय देत या जोडण्यांना परवानगी देण्याचे  आदेश दिले. पिण्याचे पाणी देण्यास प्राथमिकता द्यायला हवी... एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योगांना पाणी देण्यात येते. मात्र रहिवाशांना पिण्याचे पाणी देण्यास प्राथमिकता...

प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची सवय लावून घेतल्यास शहर स्वच्छ होईल – केडीएमसी...

केडीएमसीतर्फे आज स्स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन कल्याण दि.२३ सप्टेंबर : स्वच्छता ही एक सवय असून प्रत्येक नगरिकाने त्यात सहभाग घेतल्यास आपोआप एक लोकचळवळ उभी राहील आणि...

मोबदल्याच्या मागणीसाठी कल्याण शिळ रोडवरील बाधित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

  मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह जेल भरोचा आंदोलकांचा इशारा कल्याण दि.२० सप्टेंबर : कल्याण शिळ रस्ता रुंदीकरणातील बाधिताना अद्याप मोबदला न मिळाल्याविरोधात नाराज शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे...

कल्याणच्या या चाळीतील ४९ कुटुंबांची दुर्दशा सुरूच; सलग चौथ्या दिवशी घरांमध्ये...

  बहुधा मोठ्या दुर्घटनेनंतर केडीएमसी प्रशासन होणार जागे? कल्याण दि. 10 सप्टेंबर : कल्याणच्या चिकण घर परिसरात असणाऱ्या एका चाळीतील रहिवाशांची दुर्दशा काही केल्या संपायचे नाव घेत...

गणपतीपूर्वी रस्ता सुस्थितीत आणा अन्यथा रास्ता रोको करू – संतप्त रहिवाशांचा...

  कल्याण दि.२७ ऑगस्ट : केडीएमसी प्रशासनाने एकीकडे कालपासून प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असेल तरी अंतर्गत रस्त्यांच्या दुर्दशेवरून नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे....
error: Copyright by LNN