Home ठळक बातम्या कल्याणच्या जागेवर डॉ.श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

कल्याणच्या जागेवर डॉ.श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कल्याण – डोंबिवली दि.6 एप्रिल :
कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी महत्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीत या जागेवरून सुरू असलेल्या दावा नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त नागपूरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that Dr. Shrikant Shinde is the Grand Alliance’s candidate for Kalyan Loksabha constituency )

कल्याण लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीशी धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जाहीर घोषणा करत महायुतीचे उमेदवारावरही शिक्कामोर्तब केले आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान…
श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीनिशी उभी राहणार आहे. तसेच डॉ. श्रीकांत शिंदे यांना मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्याने महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, रासपा, रिपाई असे सर्व त्यांना निवडवून आणू. असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा