Home ठळक बातम्या कल्याणच्या गांधारी परिसरातील पुरजन्य परिस्थितीचे थरारक ड्रोन फुटेज

कल्याणच्या गांधारी परिसरातील पुरजन्य परिस्थितीचे थरारक ड्रोन फुटेज

ऋषीकेश जगताप या तरुणाने केले कॅमेऱ्यात कैद

कल्याण दि.22 जुलै :
रात्रभर झालेल्या पावसाने कल्याणात अक्षरशः हाहाकार माजवला. नदी आणि खाडी किनारी परिसरात तर पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली होती. कल्याणच्या गांधारी परिसरात काळू आणि उल्हास नदीचा संगम होत असल्याने या परिसरातील दृश्य अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारे होते. या नद्यांच्या हा सर्व रौद्रवतार कल्याणच्या ऋषीकेश जगताप या तरुणाने आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात टिपला आहे. या कॅमेऱ्याची नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त पाणीच पाणी दिसत आहे. कल्याणच्या गांधारी परिसराबरोबरच पलीकडे भिवंडी तालुक्यातील पडघा रोडवर असणाऱ्या गावातील थरारक पुरजन्य परिस्थितीही या ड्रोनने कैद केली आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा