Home ठळक बातम्या पुरजन्य परिस्थितीमूळे कल्याणात 17 हजार 800 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

पुरजन्य परिस्थितीमूळे कल्याणात 17 हजार 800 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद

 

पाणीपातळी कमी झाल्यावर वीज पुरवठा पूर्ववत करणार – महावितरण

कल्याण दि.22 जुलै :
मुसळधार पावसामुळे कल्याणात ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा पाणी पुरवठ्यापाठोपाठ आता वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. निर्माण झालेली पुरजन्य परिस्थिती पाहता महावितरणतर्फे 17 हजार 800 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडळ 1 अंतर्गत बारावे येथून निघणाऱ्या मुरबाड रोड फिडरवर प्रेम ऑटो सर्कल, शहाड, योगीधाम, घोलप नगर परिसरातील ८० रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करण्यात आले. तर तेजश्री येथून निघणाऱ्या पौर्णिमा फिडरवरील पौर्णिमा सर्कल भागातील ९ रोहित्र बंद ठेवण्यात आले. आणि मोहने फिडरवरील २० रोहित्र बंद ठेवण्यात आल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

या सर्व परिसरात साचलेल्या पाण्याची पातळी कमी होईल त्यानुसार या बाधित क्षेत्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मागील लेखजलशुद्धीकरण-उदंचन केंद्रात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवलीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 83 रुग्ण तर 92 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा