Home ठळक बातम्या आंतरराष्ट्रीय मराठी विश्वविद्यालयाची स्थापना करा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत...

आंतरराष्ट्रीय मराठी विश्वविद्यालयाची स्थापना करा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली दि.6 ऑगस्ट :

मराठी भाषेची महती जगभरात पसरलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलल्या जाणाऱ्या या मराठी भाषेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाची स्थापना करण्यात यावीअशी आग्रही भूमिका कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत मांडली. यावेळी खासगी विधेयकही डॉ. शिंदे यांनी लोकसभेत प्रस्तावित केले. हिंदी विश्वविद्यालयसंस्कृत विश्वविद्यालयाच्या धर्तीवर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी विश्वविद्यालयाची स्थापना महत्वाची ठरणार आहे.

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध प्रयत्न होत असताना आपल्या कार्यक्षेत्रात मराठीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विविध उपक्रम राबवत असतात. साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून मराठी अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी कार्यक्रमसाहित्य प्रचार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जातात. मात्र मराठीच्या सक्षमीकरणाला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे. देशभरात हिंदी आणि संस्कृत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून या भाषा अधिक वृंद्धींगत झाल्या आहेत. त्यामुळे याच धर्तीवर मराठी विश्वविद्यालयाची स्थापना करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते. त्यामुळे या भाषेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी मराठी विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

लोकसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासाठी एक खासगी विधेयक त्यांनी प्रस्तावित केले. मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच यासाठी मराठी भाषेतील अध्यापन आणि संशोधनावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडलेल्या या खासगी विधेयकामुळे मराठी विश्वविद्यालयाची वाट सुकर झाली आहे. पा

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा