Home ठळक बातम्या हिंदुस्तानचे इंफ्रास्ट्रक्चर आता नोकरदारांच्या पैशांतून उभे करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हिंदुस्तानचे इंफ्रास्ट्रक्चर आता नोकरदारांच्या पैशांतून उभे करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा दणक्यात शुभारंभ

कल्याण दि. २३ डिसेंबर :
देशातील पायाभूत सोयी सुविधांना अर्थसहाय्य करण्यासाठी आज अनेक परदेशी संस्था रांग लावून उभे आहेत. परंतु यापुढे आता हिंदुस्थानचे इन्फ्रास्ट्रक्चर नोकरदार वर्गाच्या पैशातून उभे करायचा आपला मानस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याचा सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी भविष्यातील आपल्या कल्पना आणि भावना व्यक्त केल्या.

नोकरदारांच्या पैशातून देशामध्ये हायवे उभारणार…

आपल्याला दरवर्षी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची गरज भासते विदेशातून यासाठी अनेक संस्था अर्थसहाय्य करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु यापुढे त्यांच्याकडून हा पैसा न घेता देशातील रिटायर माणूस सफाई कामगार पिऊन कॉन्स्टेबल पत्रकार आदी नोकरदार वर्गाकडून पैसे उभे करण्याची आपली इच्छा आहे. या नोकरदार मंडळींना आठ टक्के रिटर्न देऊन त्यांच्या पैशातून देशामध्ये हायवे उभारणार असल्याचे गडकरी यावे म्हणाले.

ग्लोबल इकॉनोमीमधील देश भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहताहेत…

तर संपूर्ण ग्लोबल इकॉनोमीमधील राष्ट्र भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून त्यांना भारतासोबत आपला व्यवहार करायचा आहे. त्यामुळे आपल्याला महाशक्ती व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाच्या वापराला कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आधुनिकीकरण आणि पाश्चीमात्यकरण हे दोन्ही वेगवेगळे शब्द असून पाश्चिमात्यकरणाचे आपण बिलकुल समर्थन करत नाही. मात्र आधुनिकीकरणाबाबत आवश्यक असणारे सर्व ते परिवर्तन आपण वेळोवेळी केले पाहिजे असेही नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केले.

व्यावसायिकांना कर्ज देताना कागदपत्रांचा ससेमिरा बँकांनी थांबवावा…

तर भविष्याचा विचार करता पेट्रोल आणि डिझेल ऐवजी इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी बँकेने अशा गाड्यांच्या कर्जावरील व्याजदरात कपात केल्यास लोक त्याकडे मोठ्या प्रमाणात वळतील अशी अपेक्षा वजा विनंती ही त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच कर्ज घेण्यासाठी बँकांकडून लावण्यात येणारा विविध कागदपत्रांचा तगादा थांबवण्याची गरज असून वेळेला निधी उपलब्ध झाला नाही तर व्यवसायिकाची खूप मोठे अडचण होते असे सांगतानाच उपस्थिततांमध्ये जोरदार हशा आणि टाळ्या पडलेल्या दिसून आले.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या समर्पित वृत्तीनेच लोकांच्या मनात विश्वसनीयता…

तर कल्याण जनता सहकारी बँकेच्या कामाचं कौतुक करताना गडकरी म्हणाले की विश्वसनीयता ही बाजारात विकत मिळत नाही. विश्वासनीयता हे एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे भांडवल असून त्याला शॉर्टकट नाहीये कल्याण जनता सहकारी बँकेच्या संस्थापक संचालक माजी संचालक आणि विद्यमान संचालकांनी गेल्या पन्नास वर्षांच्या काळात लोकांच्या मनात ही विश्वसनीयता निर्माण केली आहे ज्यामुळेच आज बँक या यशोशिखरावर विराजमान झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत संघचालक डॉक्टर सतीश मोढ, नवी मुंबईचे पोस्ट मास्टर जनरल गणेश साळवेश्वरकर, बँकेचे संस्थापक संचालक प्रा.अशोक प्रधान, बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, उपाध्यक्ष रत्नाकर फाटक, माजी अध्यक्ष मोहन आगरकर, व्यवस्थापकीय संचालक अतुल खिरवडकर यांच्यासह सर्व संचालक आणि पदाधिकरी उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमात बँकेच्या नविन लोगोचे, नव्या मोबाईल बँकिग ॲपचे, नविन डेबिट कार्डाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत संघचालक डॉक्टर सतीश मोढ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तर उद्योजक मधू हब्बु आणि अमित घैसास यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते समाज सेवा पुरस्कार देऊन यावेळी विशेष सत्कारही करण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा