Home ठळक बातम्या स्वातंत्र्य दिन आणि वर्धापन दिनानिमित्त कल्याणच्या वैष्णवी रुग्णालयाला अप्रतिम तिरंगा रोषणाई

स्वातंत्र्य दिन आणि वर्धापन दिनानिमित्त कल्याणच्या वैष्णवी रुग्णालयाला अप्रतिम तिरंगा रोषणाई

 

कल्याण दि.१४ ऑगस्ट :
एकीकडे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संपूर्ण कल्याण शहर सजले असतानाच आपल्या सामाजिक बांधिलकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कल्याणातील नामांकित वैष्णवी रुग्णालयही उद्या आपला १५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. ७५ वा स्वातंत्र्य दिन आणि १५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या रुग्णालयाला अप्रतिम अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे.

वैष्णवी हे कल्याणातील एक प्रसिद्ध प्रसूती (मॅटर्नीटी) रुग्णालय आहे. या रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर आश्विन कक्कर हे आपल्या सामाजिक कार्यासाठी सर्वश्रुत आहेत. १५ वर्षांपूर्वीच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २००७ रोजी त्यांनी कल्याणात हे वैष्णवी मॅटर्नीटी रुग्णालय सुरू केले. या काळात त्यांनी गोर गरीब आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असणाऱ्या अनेक गर्भवती स्त्रियांची अल्प दरात प्रसूती करत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांची ही रुग्णसेवा अजूनही सुरू असून कोवीड काळात डॉ. कक्कर यांनी दाखवलेल्या संवेदनशीलता आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक झाले होते.

हे वैष्णवी हॉस्पिटल उद्याच्या म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपला १५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याचे निमित्त साधून या रुग्णालयाला अत्यंत सुंदर अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. वैष्णवी रुग्णालयासोबतच कमिश्नर निवासस्थाना समोरील आणि केडीएमसी मुख्यालयासमोरील चौकातील उद्यानालाही अशीच आकर्षक तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा