Home ठळक बातम्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीमध्ये उद्योजक आणि व्यावसायिकांचा मोठा वाटा – शिक्षण अभ्यासक बिपिन...

देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीमध्ये उद्योजक आणि व्यावसायिकांचा मोठा वाटा – शिक्षण अभ्यासक बिपिन पोटे

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा आगळा वेगळा सोहळा

कल्याण दि.17 ऑगस्ट :
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर उद्योजक आणि व्यावसायिकानी देशाला पुढे नेण्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. त्यांनी लाखो रोजगार उपलब्ध करण्यासह देशाच्या संपत्तीमध्येही मोठी भर घातली आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर प्रगतीमध्ये उद्योजक आणि व्यावसायिकांचाही मोठा वाटा असल्याचे मत शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे सीएमडी बिपिन पोटे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि केंब्रिया इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या उद्योजक आणि व्यावसायिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर उद्योजक आणि व्यावसायिकानी देशाला पुढे नेण्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. त्यांनी लाखो रोजगार उपलब्ध करण्यासह देशाच्या संपत्तीमध्येही सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून प्रत्येकाने उद्योजकीय किंवा व्यावसायिक मानसिकता बाळगणे आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ प्रत्येकाने उद्योग व्यवसाय सुरू करावा असे नाही तर आपण प्रत्येकाने स्वतःहून कोणत्या न कोणत्या प्रकारची सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे असेही पोटे यांनी यावेळी सांगितले.

तर दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि केलाही पाहीजे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांच्या कार्याची दखल त्यांना सन्मान म्हणून साजरा केलाच पाहिजे. आताच्या काळात समाज म्हणून आपण आपला भूतकाळ अत्यंत आनंदाने साजरा करीत आहोत. मात्र आपल्या भविष्यकाळ बाबत तितकेसे जागरूक नसल्याची खंतही बिपिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच आजच्या घडीला प्रत्येक युवकाला सरकारी नोकरी पाहिजे आहे. पण जगातील सर्वात तरुण लोकशाही देशात सरकार कसे काय इतक्या मोठ्या संख्येचा युवा वर्गाला नोकरी देऊ शकेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर उपाय म्हणून प्रत्येकाने स्वतःमध्ये ही व्यावसायिक आणि उद्योजकीय मानसिकता निर्माण करणे ही काळाची आहे. तर एकीकडे आपण देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत असताना आपल्या देशामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या ही आजच्या घडीला पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा कमी आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर वाव असल्याचे पोटे यांनी यावेळी सांगितले.

आपण नेहमी असा विचार करतो की अपना टाईम आयेगा. पण तो कसा येणार? तर केवळ आणि केवळ आर्थिक विकासातूनच आपली योग्य वेळ येऊ शकते. त्यासाठी जाती धर्माचे राजकारण बाजूला ठेवून आपण विकासाची कास धरली पाहिजे. केवळ सैन्यात दाखल होणे किंवा देशासाठी ऑलिंपिक मेडल जिंकणे हीच केवळ देशभक्ती नाहीये. तर एखाद्या सामाजिक गोष्टीची स्वतःहून जबाबदारी घेणे हीदेखील एक प्रकारे देशभक्तीच असल्याचे बिपिन पोटे यांनी सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमात देशाच्या उभारणीत महत्वाचा वाटा उभारणाऱ्या अनेक दिग्गज व्यावसायिक – उद्योजकांची आणि त्यांनी देशभरात निर्माण केलेल्या रोजगारांच्या संधींची सखोल माहितीही देण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा