Home क्राइम वॉच चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आंतरराज्यीय अट्टल इराणी आरोपी मानपाडा पोलिसांकडून गजाआड

चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आंतरराज्यीय अट्टल इराणी आरोपी मानपाडा पोलिसांकडून गजाआड

 

तब्बल 5 वर्षांपासून पोलीस होते शोधात

डोंबिवली दि.20 जानेवारी :
कधीकाळी कल्याण डोंबिवलीपुरता मर्यादित असणाऱ्या कल्याणजवळील इराणी वस्तीतील गुन्हेगारांनी आता केवळ ठाणे जिल्हा, महाराष्ट्र राज्यच नव्हे तर देशभरातील विविध राज्यांमध्येही आपले हातपाय पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलिसांच्या स्पेशल स्कॉडने गाड्या चोरीप्रकरणी
एका अट्टल इराणी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या असून त्यातून ही माहिती उघड झाली आहे.

हसनैन गुलामरजा सैय्यद उर्फ ईराणी, वय वर्षे 28 असे या आरोपीचे नाव असून तो मोक्कासह विविध गुन्ह्यांसाठी पोलिसांना 5 वर्षांपासून पाहिजे होता. हसनैन कल्याणजवळील आंबिवली वस्तीत आल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली असता त्यांनी छापा घालत त्याच्या मुसक्या आवळल्या. आलेल्या प्राथमिक चौकशीत त्याने मानपाडा, शिवाजी नगर, अंबरनाथ, नारपोली, भिवंडी, रबाळे, नवी मुंबईसह कर्नाटक राज्यातील बंगलोर शहरातही गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती एसीपी जे.डी. मोरे यांनी दिली. तर यापूर्वीच त्याच्यावर पुणे, सातारा, नवी मुंबईसह विविध पोलीस ठाण्यात चोरीचे 20 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक निरीक्षक अनिल भिसे, उपनिरीक्षक सुनील तारमळे, हवालदार सुधीर कदम, सोमनाथ टिकेकर, पोलीस नाईक संजू मासाळ, सुधाकर भोसले, शांताराम कसबे, पोलीस शिपाई अशोक आहेर, सोपान काकड, पोलीस नाईक प्रशांत वानखेडे, अशोक कोकडे, सुशांत तांबे, पोलीस शिपाई संतोष वायकर, ताराचंद सोनवणे, रश्मी पाटील, सोनाली किरपण यांच्या पथकाने केली.

मागील लेखरहिवाशांच्या पुनर्वसनाशिवाय रेल्वेची कारवाई होऊ देणार नाही – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 392 रुग्ण तर 853 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा