Home ठळक बातम्या कल्याणच्या गौरीपाडा तलावात अनेक कासवांचा मृत्यू ; कारण मात्र अस्पष्ट

कल्याणच्या गौरीपाडा तलावात अनेक कासवांचा मृत्यू ; कारण मात्र अस्पष्ट

 

कल्याण दि.22 जानेवारी :
कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा तलावात अनेक कासवांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे या तलावातील केवळ कासवांचाचा कसा काय मृत्यू झाला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गौरीपाडा तलावात अनेक कासवं मृत्युमुखी पडल्याची माहिती पक्षी आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या वॉर संस्थेला मिळाली. या संस्थेच्या प्रतिनिधींनी गौरीपाडा तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. याठिकाणी एक दोन नव्हे तर सुमारे 50 – 60 मृत कासवं तलावातील पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यावरून वॉर संस्थेच्या सदस्यांनी ताबडतोब वन अधिकारी आणि स्थानिक पोलीसांनाही याबाबत माहिती दिली. तर स्थानिक लोकप्रतिनिधी दया गायकवाड यांनीही घटनास्थळी धाव घेत शासकीय यंत्रणांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले.

दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू झाल्याबद्दल प्राणी मित्रांनी संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी वॉर संघटनेचे अध्यक्ष योगेश कांबळे, सदस्य विनय नवसरे, प्रेम आहेर, पार्थ पाठारे, सुहास पवार, अभिषेक एडके आदी सदस्य घटनास्थळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा