Home ठळक बातम्या कल्याण शीळ रोडवर एनएमएमटीची बस जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही

कल्याण शीळ रोडवर एनएमएमटीची बस जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही

 

डोंबिवली दि.13 फेब्रुवारी :
नवी मुंबईहुन कल्याणकडे येणारी एनएमएमटीची (नवी मुंबई महानगरपालिका परिवहन) बस आगीमध्ये जळून खाक झाल्याची घटना आज कल्याण शिळ रोडवर घडली. आग लागल्याचे समजताच सर्व प्रवाशांनी बसबाहेर धाव घेतल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसते तरी बॅटरीने पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (NMMT bus burnt to ashes on Kalyan Shil Road; Fortunately no casualties)

आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कल्याण शिळ रोडवरील नवी रूनवाल गार्डन नजीक एनएमएमटीच्या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने तत्काळ प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. या आगीने अवघ्या काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेमुळे कल्याण शिळ मार्गावर तासभर वाहतूक कोंडी झाली होती .

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा