Home ठळक बातम्या उशिरा येत असलेल्या लोकलविरोधात टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोकोचा प्रयत्न ; वेळापत्रकावर परिणाम

उशिरा येत असलेल्या लोकलविरोधात टिटवाळ्यात प्रवाशांचा रेल रोकोचा प्रयत्न ; वेळापत्रकावर परिणाम

टिटवाळा दि.16 नोव्हेंबर :
मुंबईकडून येणाऱ्या लोकल सतत उशिराने येत असल्याचे सांगत त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी थेट रेल्वे मार्गावर उतरत रेल रोकोचा प्रयत्न केला. मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी हा प्रकार घडला.

मात्र प्रवासी रेल्वे रुळांवर उतरल्याने गाड्यांचे वेळापत्रक काहीसे कोलमडले आहे. मुंबईकडून येणाऱ्या लोकल गाड्या सतत उशिराने येत असल्याने प्रवाशांना कामावर जायलाही उशिर होत होता. आजही तसाच प्रकार घडल्याने प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत झाला आणि त्यांनी थेट रेल्वे रुळांवर उतरत लोकल ट्रेन रोखून धरल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान रेल्वे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या प्रवाशांना बाजूला करत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरु केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा