Home ठळक बातम्या गुडन्युज : काळा तलाव सुशोभीकरणाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण – केंद्रीय राज्यमंत्री कपिल...

गुडन्युज : काळा तलाव सुशोभीकरणाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची माहिती 

कल्याण दि. 15 नोव्हेंबर :

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असणारे काळा तलाव सुशोभीकरणाचे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होईल असे सांगत सुशोभित झालेला काळा तलाव परिसर ही कल्याणवासीयांना नव्या वर्षाची भेट असेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकच्या माध्यमातून स्मार्टसिटी योजनेअंतर्गत कल्याणातील ऐतिहासिक काळा तलाव आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामाची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, माजी नगरसेवक वरुण पाटील उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने काळा तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. ते सध्या अंतिम टप्प्यात आले असून केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी महपालिका अधिकाऱ्यांकडून त्याची संपूर्ण माहिती घेतली. तसेच यावेळी कपिल पाटील यांनी काळा तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशीही संवाद साधला.

काळा तलावालगत राहणाऱ्या कुटुंबांना क्लस्टर योजनेअंतर्गत घरे देता येतील का, याबाबत आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच बीएसयूपी योजनेतही त्यांच्या समावेशाबाबत चाचपणी केली जात असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. तर सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन काळा तलाव आणखी सुंदर करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा