Home ठळक बातम्या शहाडमध्ये पाणी ओसरले मात्र कचरा आणि गाळ पसरला रस्त्यावर

शहाडमध्ये पाणी ओसरले मात्र कचरा आणि गाळ पसरला रस्त्यावर

 

कल्याण दि.10 जून :
अवघ्या 2 तासांच्या पावसात कल्याणजवळील शहाड परिसर जलमय झाला होता. पाऊस थांबल्यावर याठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी ओसरले असले तरी कचरा आणि गाळ मात्र तसाच दुकान आणि सोसायटीच्या दरवाजासमोर साचून राहिला होता. यामुळे स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत महापालिका आणि तिने केलेल्या नालेसफाईच्या नावाने बोटे मोडली.

काल संध्याकाळी अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक काहीसे आनंदित झाले. परंतु शहाडवासियांचा आनंद हा अल्पकाळच ठरला. कारण अवघ्या काही मिनिटात इथल्या रस्त्यावर पावसाचे गुडघाभर पाणी साचलेले पाहायला मिळाले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद तर झालाच मात्र कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना त्याच गुडघाभर पाण्यातून वाट काढत आपल्या घरी जावे लागले. कालच्या प्रकारावरून केडीएमसीने कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या उपस्थित झाले आहे.

दरम्यान पाऊस थांबल्यानंतर नाही पाणी काहीवेळा तो सोडून गेले ओसरून गेले. मात्र या पाण्यामुळे हा संपूर्ण परिसर कचरा आणि गाळाने भरून गेला होता. या ठिकाणी असणाऱ्या रहिवासी सोसायटी आणि दुकानात आणि दुकानांसमोर ही सर्व घाण साचली होती. या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांनी महापालिका आणि तिने केलेल्या नालेसफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चांगलीच आगपाखड केली. तर अद्याप पावसाळा सुरूही झाला नसून पावसाळ्यात काय होईल या भीतीने स्थानिक रहिवासी चिंतित झाले आहेत.

मागील लेखअवघ्या दोन तासांच्या पावसात शहाड परिसरात साचले पाणी
पुढील लेख…अन्यथा आगामी केडीएमसी निवडणुक स्वबळावर – जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा