Home ठळक बातम्या भर पावसात कल्याण पूर्वेच्या आमदारांनी केले असे काम की होतेय कौतुक

भर पावसात कल्याण पूर्वेच्या आमदारांनी केले असे काम की होतेय कौतुक

 

कल्याण दि.20 जुलै :
एकीकडे आभाळातून अव्याहत कोसळणारा मुसळधार पाऊस, तर दुसरीकडे दर मिनिटागणिक वाढत जाणाऱ्या नदी पात्रातील पाण्यामुळे वाढत चाललेला धोका. मात्र अशा परिस्थितीत कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या कामाची चांगलीच चर्चा आणि मोठे कौतुक होत आहे.

बुधवार पावसाने कल्याण आणि डोंबिवली परिसरासह अंबरनाथ, बदलापूरलाही चांगलेच झोडपून काढले. परिणामी उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठया प्रमाणत वाढ झाली. परिणामी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी स्मशानभूमी परिसरातून वाहणाऱ्या नदी पात्रातील पाणी हळूहळू रस्त्यापर्यंत येऊन पोहोचले. एकीकडे पाऊस काही थांबायचे नाव घेत नव्हता आणि नदी पात्रातील पाणी शेजारील चाळींमध्ये शिरण्याचा धोका वाढत चालला होता.

विठ्ठलवाडी स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या या नदीपात्रात पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला होता. ज्यामुळे नदीचे पाणी हळूहळू बाहेर पसरू लागल्याने आजूबाजूच्या रहिवासी भागात शिरण्याचा धोका संभवत होता. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांना या परिस्थितीबाबत माहिती मिळताच त्यांनी केडीएमसीच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. आणि काही क्षणातच आपत्कालीन विभागाचे एक पथक जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी जेसीबी थांबवत आमदार गणपत गायकवाड स्वतः त्यामध्ये चढले. आणि मग जेसीबीमध्ये बसून नदीपात्रात वाहून आलेला कचरा काढून घेत पाणी जायला जागा करून दिली. आमदार गायकवाड यांच्या या कृतीने त्याठिकाणी उपस्थित स्थानिक रहिवासी एकदम अवाकच झाले. वास्तविक पाहता संबंधित आपत्कालीन पथकाकडून त्यांनी हे काम करून घेता आले असते. परंतू तसे न करता स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण कचरा निघत नाही तोपर्यंत आमदार गायकवाड जेसीबीमध्ये ठाण मांडून बसले.

अखेर संपूर्ण कचरा बाहेर काढल्यावर आणि पाण्याचा प्रवाह योग्यरीतीने सुरू झाल्यानंतरच ते जेसीबीमधून खाली उतरले. त्यांच्या या कृतीने त्याठिकाणी उपस्थित स्थानिक रहिवासी चांगलेच अवाक तर झालेच पण सोबत त्यांनी आमदार गायकवाड यांचे कौतुकही केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा