Home ठळक बातम्या सेंचुरी रेयॉन कंपनीतील युनियनच्या प्रमुख सल्लागारपदी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

सेंचुरी रेयॉन कंपनीतील युनियनच्या प्रमुख सल्लागारपदी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

कामगारहिताची सेंचुरी मारणार’ कपिल पाटील यांचे निवडीनंतर आश्वासन

कल्याण, दि. २५ ऑगस्ट :
ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य कंपनी असणाऱ्या `सेंचुरी रेयॉनमधील वर्कर्स युनियनच्या प्रमुख सल्लागारपदी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सरकार, कंपनी मालक आणि संघटना हा त्रिवेणी संगम आहे. कामगारहिताबरोबरच कंपनीला बाधा येणार नाही अशा पद्धतीने काम करून कामगारहिताची सेंचुरी मारू अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी निवडीनंतर व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी कंपनीला भेट देत व्यवस्थापनाचे वरिष्ठ प्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी आणि काही कामगारांबरोबर संवाद साधला. यावेळी कंपनीचे युनिट हेड अपूर्व गुप्ता, उपाध्यक्ष (मनुष्यबळ) श्रीकांत गोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष योगेश शहा, युनियनचे अध्यक्ष रवींद्र कोनकर, महामंत्री रमेश यादव, उपाध्यक्ष प्रमोद काळे, भाजयुमोचे प्रदेश सचिव सुनिल राणा, युनियनचे कार्यकारिणी सदस्य विजय मढवी, सचिन भोईर, कमलेश सिंग, भगवान भगत, योगेश केणे, किरण भोईर, संतोष देसले, कृष्णा काळे, उदय शिंगले, परमेश्वर पालवी आदी उपस्थित होते.

राजकीय कारकिर्दीत आपण प्रथमच कामगार क्षेत्रात पाऊल टाकत आहोत. क्रिकेटमध्ये सेंचुरी असते, तशीच येथेही कामगारहिताची सेंचुरी मारेन. कंपनी व्यवस्थापन आणि युनियन यांच्यात समन्वय ठेवून कार्य करणार आहे. कंपनी मोठी झाली, तर कामगारही मोठा होईल. लक्ष्मी म्हणून कामगारांनी कंपनीकडे पाहून कार्य करावे, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा