Home क्राइम वॉच डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

डोंबिवलीत ज्वेलर्स मालकावर अज्ञाताकडून हल्ला; सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

 

पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू

डोंबिवली दि.18 मे : 
डोंबिवलीतील पूर्वेतील आगरकर रोडवर असणाऱ्या ज्वेलर्स दुकानात घुसून थेट दुकान मालकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. या हल्ल्यात दुकान मालक जखमी झाले असून हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. तर या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनीही या अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

डोंबिवली पूर्वेच्या आगरकर रोडवर मन्ना गोल्ड नावाचे दुकान असून दुकानाचे मालक तारकनाथ मन्ना (54 वर्षे) हे दुकानात बसले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास दुकानात एक अनोळखी व्यक्ती आली आणि त्याने थेट मन्ना यांच्यावर चाकूच्या साहाय्याने हल्ला चढवला. आणि मन्ना यांना काही समजायच्या आतच त्याने तिथून धूम ठोकली. दरम्यान या हल्लेखोराने दुकानातील कोणतीही वस्तू न नेल्याने आश्चर्य व्यक्त होत असून कदाचित पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.

 

मागील लेखएमसीएचआयतर्फे १९ ते २२ मे दरम्यान कल्याणात प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन
पुढील लेखशहरातील चांगल्या गोष्टींवर नागरिकांनी अधिक भर देण्याची गरज – केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा