Home ठळक बातम्या “भिवंडी लोकसभेत एकत्रितपणे महायुतीचे काम करा ” , सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र...

“भिवंडी लोकसभेत एकत्रितपणे महायुतीचे काम करा ” , सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचना

डोंबिवली दि .12 एप्रिल :
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणतेही हेवेदावे न ठेवता एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने पडदा पडला आहे. (work-together-in-bhiwandi-lok-sabha-as-a-grand-alliance-pwd-minister-ravindra-chavan-and-mp-dr-srikant-shinde)

भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये काहीसे गैरसमज निर्माण झाले होते. ज्याचा परिणाम होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने भिवंडी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये सर्व गैरसमज आणि हेवेदावे विसरून एकत्रितपणे महायुतीचे काम करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

त्यासोबतच येत्या काळात कोणतेही गैरसमज झाल्यास किंवा काही अडचण आल्यास थेट आमच्याशी संपर्क साधण्याची सूचनाही मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिल्या.

तर ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी समज गैरसमज बाजूला ठेवून पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आवाहनही मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा