Home कोरोना केडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (6 सप्टेंबर) 25 ठिकाणी लसीकरण; 2 केंद्रांवर केवळ...

केडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (6 सप्टेंबर) 25 ठिकाणी लसीकरण; 2 केंद्रांवर केवळ महिलांचेच लसीकरण

 

कल्याण – डोंबिवली दि. 5 सप्टेंबर :
केडीएमसीतर्फे उद्या 6 सप्टेंबर रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये 25 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जाणार आहे. त्यातही विशेष म्हणजे मातृदिनाचे औचित्य साधून 2 केंद्रांवर केवळ महिला वर्गाचेच लसीकरण केले जाणार आहे. तर दिव्यांग व्यक्ती आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना टोकनशिवाय लस दिली जाणार आहे. संबंधित दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्राची छायांकित प्रत जवळ बाळगणे आवश्यक आहे.

उद्याच्या लसीकरण मोहीमेत कल्याण पश्चिमेच्या लालचौकी आर्ट गॅलरी येथे आणि डोंबिवली पूर्वेतील सावळाराम क्रिडा संकुल येथे केवळ महिलांसाठी कोवीशिल्ड लसीचा 1 ला आणि 2 रा डोस दिला जाणार आहे.

तर आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कोवीशिल्ड लसीचा केवळ 2 रा डोस दिला जाणार आहे. तर उर्वरित लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा 1ला आणि 2 रा डोस दिला जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

या लसीकरणासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट खुले होतील. तसेच ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्याकरिता, आधार कार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहितीही केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा