Home ठळक बातम्या उष्णतेची लाट कायम : कल्याण डोंबिवलीमध्ये आजही 42 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद

उष्णतेची लाट कायम : कल्याण डोंबिवलीमध्ये आजही 42 अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद

सलग तिसऱ्या दिवशी तापमान चाळीशीपार

कल्याण डोंबिवली दि.29 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीकरांचे गेल्या आठवड्याचे शेवटचे दोन दिवस तापदायक ठरल्यानंतर आज नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही काल आणि परवाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. शनिवार, रविवारपाठोपाठ आजच्या सोमवारीही कल्याण डोंबिवलीमध्ये 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

गेल्या 2 दिवसांपासून असह्य उकाडा आणि भयानक गर्मीने कल्याण डोंबिवलीकर चांगलेच हैराण झाले आहेत. हवामान विभागाने कोकण परिसरामध्ये वर्तवलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे कल्याण डोंबिवली परिसरातही तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. गेले सलग तीन दिवस या दोन्ही शहरांमध्ये शहरांमध्ये शनिवारी 41 अंश सेल्सिअस तर रविवारी 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. आजही त्याचाच कित्ता गिरवला गेला आणि कल्याणमध्ये 42.1 तर डोंबिवलीमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे अभिजीत मोडक यांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवलीप्रमाणे आसपासच्या बहुतांश शहरांमध्येही 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे.

तर उद्याच्या दिवसापर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिनापासून तापमानात काहीशी घट होऊन ते 38 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहू शकेल असा अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला आहे.

फोटो सौजन्य : हवामान अभ्यासक अभिजीत मोडक

प्रमूख शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले रविवारचे तापमान…

कल्याण 42.1
डोंबिवली 42
मुंबई 39.1
मिरा रोड 40
विरार 40.5
नवी मुंबई 41.1
पालघर 41
तलासरी 40.7
मुंब्रा 41.5
मुलुंड 40.4
ठाणे 41.2
कळवा 41.9
बदलापूर 42
मनोर 41.2
धसई 42.4
भिवंडी 42.3
कर्जत 44.1
मुरबाड 43.5

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा