Home ठळक बातम्या डोंबिवलीत नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली ; ३ विद्यार्थ्यांसह बाईकस्वार जखमी

डोंबिवलीत नियंत्रण सुटल्याने बस रिक्षाला धडकली ; ३ विद्यार्थ्यांसह बाईकस्वार जखमी

डोंबिवली दि.१८ ऑक्टोबर :

डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाजवळ आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला. पूर्वेकडून पश्चिमेला येणाऱ्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन रिक्षा आणि एका बाईकला धडक दिली आणि नंतर ही बस समोर असणाऱ्या खांबावर आदळली. या अपघातात रिक्षातील ३ शालेय विद्यार्थ्यांसह एक बाईकस्वार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या सर्वांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा