कल्याण दि.२८ जून :
कल्याणातील अलका सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर मनोहर वायले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार आधी मान्यवरांच्या उपस्थितीत सुधीर वायले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
अलका सावली प्रतिष्ठानच्या माध्यामतून सुधीर वायले हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्यासही ते इच्छुक आहेत. त्यादृष्टीने सुधीर वायले यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह स्वप्नील काटे, विकी गणात्रा, अर्जुन म्हात्रे, शक्तिवान भोईर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.