Home कोरोना इलेकट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी – केडीएमसी आयुक्तांचे आदेश

इलेकट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी – केडीएमसी आयुक्तांचे आदेश

 

कल्याण डोंबिवली दि.21 मे :
नुकत्याच येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाने कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे.

तौक्ते चक्रीवादळाने कल्याण डोंबिवलीतही घरांचे मोठे नुकसान केले आहे. आगामी तोंडावर आलेला पावसाळा पाहता या घरांची तातडीने दुरुस्ती होण्यासाठी केडीएमसी आयुक्तांनी 22 मे ते 31 मे या कालावधीत सोमवार ते शुक्रवारपर्यंत संबंधित दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यामध्ये केवळ इलेकट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्याच्या दुकानांचा समावेश असून दिलेल्या कालावधीत ती सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी महापालिका आयुक्तांनी दिली आहे. मात्र त्यासाठी पालिकेने आदेशीत केलेल्या निर्बंधांचे दुकानदार आणि ग्राहकांनी पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करत उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान केडीएमसी आयुक्तांच्या या नव्या निर्णयांमुळे चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना घर दुरुस्तीची परवानगी मिळाल्याने दिलासा मिळणार आहे.

काय आहेत नेमके नविन आदेश..

  • केवळ इलेकट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांनाच सशर्त परवानगी…
  • 22 मे 2021 ते 31 मे 2021 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा…
  • सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने…
  • शनिवार आणि रविवार दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी लागणार…
  • दुकानदार आणि ग्राहक डबल मास्क घालणे बंधनकारक…
  • एकाचवेळी जास्तीत जास्त 5 ग्राहकांना प्रवेश…
  • दुकानात पुरेशा प्रमाणात सॅनिटायजर आवश्यक

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा