Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीणमधील मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण ग्रामीणमधील मनसे पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

डोंबिवली दि.16 ऑक्टोबर :
एकीकडे नवरात्रौत्सवातील गरबा -दांडियाची धुम कालपासून बघायला मिळत असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय दांडियाही तितक्याच जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. कल्याण ग्रामीणमधील मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. (Entry of MNS functionaries-activists from Kalyan Rural into Shiv Sena in the presence of mp Dr. Shrikant eknath shinde)

म्हणून दिली मनसेला सोडचिठ्ठी…

काम करायची इच्छा असुनही काम करण्यास वाव मिळत नाही. तर उलटपक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळणारी कामाची संधी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असणारी विकासकामे पाहून आपण प्रभावित झाल्यानेच आपण हा पक्षप्रवेश करत असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि मनसेमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मनसेला दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

विकासाची घोडदौड पाहून लोकांचा पक्षप्रवेश – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभेत सुरू असणारी कामे आणि आमच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना काम करण्यास मिळणारा वाव पाहून आज हे पक्ष प्रवेश झाले आहेत.
राज्यातील जनतेसाठी मुख्यमंत्री 16 -16 तास काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला फिल्डवर काम करणारे लोकांमध्ये जाणारे कार्यकर्ते पाहिजे असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच आमची तळागाळात जाऊन काम करण्याची सवय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणारी विकासाची घोडदौड पाहून लोक प्रवेश करत आहेत. येत्या काळातही अनेक जण प्रवेश करतील असे सूचक विधानही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

मनसेच्या या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला प्रवेश…

१. ॲडव्होकेट सुहास तेलंग
२. ओम लोके- मनसे शहर अध्यक्ष, रस्ते आस्थापना डोंबिवली
३. शीतल लोके- महिला विभाग अध्यक्ष
४.चंद्रकांत सावंत – शहर सचिव रस्ते आस्थापना डोंबिवली
५. रुतीकेश वाळुंज- उपशहर अध्यक्ष रस्ते आस्थापना
६. चेतना सावंत- महिला शाखा अध्यक्ष प्र. क्र.११३
७.राकेश धुरी- उपशाखा अध्यक्ष प्र क्र ११३
८.सुमीत बाद्रे- इमारत प्रतिनिधी
९.विनय यादव – इमारत प्रतिनिधी
१०.भूषण सावंत – इमारत प्रतिनिधी
११.गोपाल गुप्ता- इमारत प्रतिनिधी
१२. संदेश सावंत- इमारत प्रतिनिधी
१३.रवींद्र खंदारे- उपशाखा अध्यक्ष प्र. क्र.११३
१४. मिलिंद नेवरेकर- इमारत प्रतिनिधी
१५.स्मिता नारळे- इमारत प्रतिनिधी
आणि अनेक कार्यकर्ते

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा