Home ठळक बातम्या युथ गेम्सच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक; कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंची चमकदार कामगिरी

युथ गेम्सच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक; कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंची चमकदार कामगिरी

कल्याण डोंबिवली दि.9 सप्टेंबर :

राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे सुवर्ण पदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघामध्ये कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याचे दिसून आले. कल्याणातील नामांकित बी.के.बिर्ला महाविद्यालयाच्या खेळाडूंनी या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. (Gold Medal for Maharashtra in National Kabaddi Tournament of Youth Games; Brilliant performance by Kalyan Dombivli players)

जयपूरमध्ये गेल्या आठवड्यात युथ गेम्स डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे 8 राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. देशभरातील विविध राज्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर कबड्डीमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या संघांमध्ये अंतिम सामना झाला. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी उत्तर प्रदेशच्या संघावर 35-29 अशा 6 गुणांच्या फरकाने मात केली.

विशेष म्हणजे अंडर 19 च्या या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी चमकदार केली. महाराष्ट्राच्या या संघामध्ये करण चौहान – बी.के.बिर्ला नाईट कॉलेज कल्याण, रतिष नितीन मढवी – स्वामी विवेकानंद नाईट कॉलेज डोंबिवली, शिवम दिलीप विश्वकर्मा – बी.के.बिर्ला नाईट कॉलेज कल्याण, अथर्व राजकुमार खुटल – बी.के.बिर्ला नाईट कॉलेज कल्याण, विनीत पवार – आय टी आय गव्हर्मेंट कॉलेज मुलुंड (पूर्व), आकाश घनशाम यादव – बी.के.बिर्ला नाईट कॉलेज कल्याण, पार्थ अनिल जोगळे – वंदे मातरम् कॉलेज डोंबिवली आणि गणेश खटाळे – आय टी आय गव्हर्मेंट कॉलेज ठाणे या युवा खेळाडूंचा समावेश होता.

या सर्व खेळाडूंना महाराष्ट्राचे संघ व्यवस्थापक संकेत शिवाजी कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. तर युथ गेम्स डेव्हलोपमेंट फेडेरेशन ऑफ इंडियाचे महासचिव जितेंद्रसिंग गुर्जर यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा