Home ठळक बातम्या हृदयद्रावक घटना : लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू

हृदयद्रावक घटना : लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू

 

डोंबिवली दि.५ जुलै :
डोंबिवली पूर्वेतील सागर्ली गावात इमारतीच्या लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. या घटनेने सागर्ली भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेदांत हनुमंत जाधव (6) असे या चिमुरड्याचे नाव असून तो आजी, आजोबा आणि वडिलांसोबत राहत होता.

वेदांत एक वर्षाचा असताना आईला तो पारखा झाला. त्याचा सांभाळ आजी, आजोबा करत होते. मंगळवारी सकाळी वेदांत नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेला. तो दुपारी जेवण करण्यासाठी परत आला नाही, म्हणून त्याच्या आजी, आजोबांनी शोधाशोध केली. तो कुठेच आढळला नाही. त्याचे नेहमीचे मित्र घरी होते. त्यांनीही वेदांतला आम्ही पाहिले नाही असे सांगितले. त्यामुळे आजी, आजोबा घाबरले. परिसरातील रहिवाशांनी वेदांतचा शोध सुरू करत या भागातील विहिरी, नाले तपासले. त्याचवेळी इमारतीच्या शेजारी तपास केला असता त्याच्या घराशेजारील इमारतीमध्ये लिफ्टसाठी खणलेल्या खड्डयातील पाण्यामध्ये तो तरंगताना आढलून आला. घाबरलेल्या रहिवाशांनी त्याला हे शिडी, दोर लावून त्याला बाहेर काढत रुग्णालयात नेले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

वेदांतचे वडील खासगी सफाई कामगार आहेत. गेल्या वर्षीही सांगावमध्ये अशाच प्रकारे खड्ड्यात पडून पाच वर्षाचा मुलगा मरण पावला होता. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. यामधील बहुतांशी इमारतींना लिफ्टची सुविधा देण्यासाठी खड्डे खोदून ठेवले आहेत. अशा बेकायदा इमारतींवर कारवाई होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा