कल्याण – डोंबिवली दि.२६ डिसेंबर :
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील तापमानात लक्षणीय घट होताना दिसत आहे. या घसरत्या पाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीला हुडहुडी भरली असून आज सकाळी पुन्हा १२ अंश इतके कमी तापमान नोंदवण्यात आले.
शनिवार संध्याकाळपासून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर पट्ट्यामध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. तर यंदाच्या वर्षातील शेवटच्या रविवारची सकाळ ही चांगलीच गारेगार ठरल्याचे दिसून आले. तर आज दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा याच गुलाबी थंडीचे दर्शन होत आहे. परिणामी आज सकाळीही कल्याण डोंबिवलीमध्ये १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर डोंबिवली ते बदलापूर पट्ट्यामध्ये बदलापूर शहरामध्ये सर्वात कमी तापमान नोंदवले गेल्याची झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
आज नोंदवण्यात आलेले किमान (mini)तापमान
बदलापूर 10
कल्याण 12.4
डोंबिवली 12.8
ठाणे 14.5
नवी मुंबई 15
कर्जत 10.4
मुंबई 16