Home ठळक बातम्या केडीएमसी सार्वत्रिक निवडणुक : निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी झाली प्रसिद्ध

केडीएमसी सार्वत्रिक निवडणुक : निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी झाली प्रसिद्ध

 

कल्याण – डोंबिवली दि. 23 जून :
कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात आणि प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयात या मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती केडीएमसीचे प्रभारी आयुक्त राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून ही प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

31 मे 2022 पर्यंतच्या विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 23 जून ते 1 जुलै पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत केवळ मतदारांचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेचे यादीत नाव असूनही प्रभागाची यादीत नाव नसणे, मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका दुरुस्त करणे याच स्वरूपाच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर एक आठवड्याने म्हणजेच 9 जुलै 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.

31 मे 2022 पर्यंतच्या मतदार यादीनुसार कल्याण-डोंबिवली क्षेत्रात 12 लाख 39 हजार 130 मतदार आहेत. त्यापैकी 6 लाख 61 हजार पुरुष तर 5 लाख 76 हजार महिला मतदार आहेत. तर इतर मतदारांची संख्या 374 इतकी आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, निवडणुक विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप, केडीएमसी सचिव संजय जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

मतदार याद्यांचा कार्यक्रम…

प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे – 23 जून 2022

हरकती आणि सूचना दाखल करणे – 23 जून ते 1 जुलै 2022

अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे – 9 जुलै 2022

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा