Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत सलग 5 व्या दिवशी पारा चाळीशी पार; मात्र तापमान घटले

कल्याण डोंबिवलीत सलग 5 व्या दिवशी पारा चाळीशी पार; मात्र तापमान घटले

 

कल्याण – डोंबिवली दि.18 मार्च :
असह्य उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण डोंबिवलीत आज सलग 5 व्या दिवशी तापमानाने चाळीशी ओलांडली. मात्र तापमानात कालच्या पेक्षा 2 अंशांनी घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.

रोज नवनविन उच्चांक गाठणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील तापमानाने काल रेकॉर्ड ब्रेक वाढ नोंदवली. गेल्या 5 वर्षांतील सर्वाधिक म्हणजेच 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून कल्याण डोंबिवलीतील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे.

हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या उन्हाळ्यातील मार्च महिना हा गेल्या काही वर्षांतील सर्वात जास्त उष्णतेचा ठरला आहे. तर सोमवारपासून कल्याण डोंबिवलीतील तापमानाने सलग 5 दिवस 40 ओलांडत कल्याण डोंबिवलीकरांच्या डोक्याला चांगलाच घाम फोडला आहे. गेल्या 5 दिवसांपासून सूर्य नारायण अक्षरशः आग ओकत आहे.

आजही कल्याण डोंबिवलीमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडत कल्याणात 41 तर डोंबिवलीत 40.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवल्याची माहिती अभिजीत मोडक यांनी एलएनएनला दिली. आजपासून तापमानात दिवसागणिक घट होण्यास सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत 37 ते 38 अंशांपर्यंत हे तापमान पोहोचण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

प्रमुख शहरातील आजचे तापमान

कल्याण – 41
डोंबिवली – 40.8
उल्हासनगर – 40.8
बदलापूर – 40.8
ठाणे – 40.2
भिवंडी – 41
कर्जत – 41.4

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा