Home ठळक बातम्या डोंबिवलीतील शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवलीतील शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

डोंबिवली दि. 21 मार्च :
आज तिथीनुसार असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवलीत विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. युवासेना उपशहर अधिकारी संदेश हरिश्चंद्र पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित डोंबिवली पश्चिमेत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्र आणि ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.

या शिवकालीन शस्त्रास्त्र आणि वस्तू प्रदर्शनात ऐतिहासिक शिवकालीन दांडपट्टे, धोप, मुल्हेरी मुठीची तलवार, तेगा, उना, गोलिया पद्धतीची तलवार, मराठा कट्यार, विजयनगर कट्यार, बिचवा, खंजीर, अडकित्ता, कर्द, खंजराली, गुप्ती, माडू, परशु, धनुष्यबाण आदी दुर्मिळ खजिना लोकांना ‘याची देही,याची डोळा’ पाहायला मिळाला. त्यामूळे लहान- मोठे युवा अशा सर्वच शिवप्रेमी नागरिकांनी इथे मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे लोकांना या शस्त्रांची माहिती होण्यासाठी प्रत्येक शस्त्र आणि वस्तूची सखोल माहिती तसेच त्याचे ऐतिहासिक महत्वही त्याठिकाणी देण्यात आले होते. या प्रदर्शनासोबतच शिवश्री यशवंत गोसावी यांच्या शिवचरित्र व्याख्यानाचेही आज आयोजन करण्यात आले होते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उपशहर संघटक हरिश्चंद्र पाटील, युवासेना उपशहर अधिकारी संदेश पाटील यांच्यासह राजन म्हात्रे, मनोज वैद्य, राजकुमार म्हात्रे आदीनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा