Home ठळक बातम्या अनियमित पाणी पुरवठ्याविरोधात संतप्त रहिवाशांची एमआयडीसी कार्यालयावर धडक

अनियमित पाणी पुरवठ्याविरोधात संतप्त रहिवाशांची एमआयडीसी कार्यालयावर धडक

 

डोंबिवली दि. ३० मे :
शटडाऊन काळात जाहीर केलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ पाणी पुरवठा बंद ठेवल्याविरोधात आणि एरव्ही अनियमितपणे होणाऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात डोंबिवली एआयडीसी रहिवासी भागातील नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.(Outraged residents strike MIDC office over irregular water supply)

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गेल्या आठवड्यात एमआयडीसीतर्फे देखभाल दुरुस्ती कामानिमित्त २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आला. मात्र जाहीर केलेल्या २४ तासांपेक्षा दुप्पट वेळ उलटूनही हा पाणी पुरवठा सुरू न झाल्याने निवासी विभागातील नागरिक संतप्त झाले होते. अखेर आज या सर्व नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांसमोर आपला रोष व्यक्त केला. तसेच शटडाऊनच्या ठरवलेल्या वेळेनंतरही पाणी पुरवठा का झाला नाही याबाबत नागरिकांना माहिती का कळवली नाही असा संतप्त सवाल केला. तर येत्या काळात निवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर भविष्यात नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याचा गर्भित इशाराही नागरिकांनी यावेळी दिला.

दरम्यान ज्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. ती सर्व कामे शटडाऊनच्या वेळेत पूर्ण झाली. मात्र पाणी पुरवठा सुरू करण्याच्या वेळेस अंबरनाथ येथे एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता विजय शांताराम धामापूरकर यांनी नागरिकांना दिली. तसेच निवासी भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय आहे सुरू असून येत्या वर्षभरात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील असा विश्वासही धामापूरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा