Home ठळक बातम्या कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश मुथा यांची निवड

कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश मुथा यांची निवड

 

कल्याण दि.14 फेब्रुवारी :
कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरातील सोने चांदीच्या व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या ‘कल्याण शहर ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश मुथा यांची निवड झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याणातील ज्वेलर्स व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत एकमताने मुथा यांची निवड करण्यात आली.

संघटनेची ही कार्यकारिणी पुढील 3 वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे. ज्यामध्ये उपाध्यक्षपदी पराग जैन, नितीन जैन, सचिन घोडके तर सचिवपदी मदन शंकलेशा, सहसचिवपदी सुनेख जैन, संजय शहा, खजिनदारपदी रवी जैन, सहखजिनदारपदी भूषण शहा तर सल्लागारपदी मोतीभाई शंकलेशा, गौतम शंकलेशा, जयंती रावल, अजित संघवी, नरेश शंकलेशा, किशोर शंकलेशा तर कार्यकारी सदस्यपदी प्रकाश शंकलेशा, कमलेश जैन, नवीन जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोने चांदी व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष राकेश मुथा यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा